मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान असणारा कर्नाक पूल आता पाडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. धोकादायक असल्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर 25 तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. हा पूल पाडणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असल्याचे सांगण्यात येत असून लवकरच हा पूल पाडण्याची तारीख ठरवण्यात येणार आहे.
90 दिवसांत पूल पाडणार
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान असलेला कर्नाक पूल पाडण्यात येणार आहे. धोकादायक असल्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कर्नाक पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 90 दिवसांत हा पूल पाडण्याचे आव्हान मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेसमोर आहे.
(हेही वाचाः गणेशोत्सव मंडळांना मिळणार घरगुती दरात वीज, महावितरणचा निर्णय)
25 तासांचा मेगाब्लॉक
हा पूल पाडण्यासाठी तब्बल 25 तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. हा पूल पाडण्याची तारीख लवकरच मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community