महापालिकेच्या चार्जिंग सेंटरमध्ये आणखी पडणार २५ युनिटची भर

देशात वाढणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाहन प्रदूषणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ताफ्यांमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांचा समावेश केला जात असून या वाहनांकरता चार्जिंग सेँटरची निर्मिती महपालिकेच्यावतीने केली जात आहे. त्याकरता महापालिकेच्यावतीने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत पायाभूत व्यवस्थेसह २५ चार्जिंग स्टेशन बसवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

( हेही वाचा : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी नवे संकेतस्थळ: आता कुणाला विचारु, कुणाकडे जावू ही समस्याच सुटली!)

विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्नशील असून वाहनांच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे ही काळाची गरज असून पर्यावरण पुरक अशा विजेवरील वाहनांमुळे रस्त्यावर प्रदूषकांचे उत्सर्जन होत नाही. शिवाय विजेवर चालणारी वाहने ग्रीनहाऊस ग्रॅसचे उत्पादन करण्यात मदत करतात.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या २३ जुलै २०२१च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर करण्यात आले आहे आणि धोरणानुसार पायाभूत चार्जिंग व्यवस्था उभारणीकरता प्रोत्साहन दिले आहे. सध्या चांगल्या अणि स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरणासाठभ् महापालिकेत टाटा नेक्सन हे विजेवर चालणारे एकमेव वाहन असून भविष्यात अशाप्रकारे विजेवर चालणाऱ्या ३५ वाहनांची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत महापालिकेच्या यानगृहात अर्थात गॅरेजमध्ये तसेच महापालिका मुख्यालय इमारतींमध्ये बॅटरी चार्जिंगचे ६ युनिट बसवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आणखी २५ युनिट बसवले जात आहेत. हे चार्जिंग युनिट महापालिकेच्या विविध गॅरेजेसमध्ये तसेच पार्किंगच्या ठिकाणी बसवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या परिवहन विभागाने दिली आहे.

या २५ युनिटची स्थापना करण्यासाठी मेसर्स ए.एस.सी. पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून एका युनिटकरता १० लाख ६४ हजार ७५० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या सर्व युनिटची पुढील तीन वर्षांकरता देखभाल व दुरुस्ती आदींसह यावर विविध करांसह ४ कोटी १० लाख ६४ हजारांचा खर्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध गॅरेजेसमध्ये विविध प्रकारच्या सुमारे ८५० वाहनांचा ताफा असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना तसेच इतर व्हीआपींना पर्सनल कॅरिअर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सेवांकरता महापालिकेकडे एकूण १७१ पर्सनल कॅरिअर वाहनांचा ताफा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here