कोकणात जाण्यासाठी पुण्यातून एसटीच्या २५० विशेष बस

233

गणेशोत्सवाला मुंबई-पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. नोकरीसाठी पुण्यात आलेल्या कोकणवासीयांना पुण्यातच दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करावा लागला. परंतु यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने चाकरमान्यांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी २५० विशेष बसची व्यवस्था पुणे एसटी विभागातर्फे करण्यात आली आहे. यासह इतर शहरांमध्ये जाण्यासाठी देखील १५० स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट)

कोकणवासीयांसाठी २५० विशेष बसची व्यवस्था

कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी १७० बस नियुक्त केल्या असून त्यातील १२० बस संपूर्ण बुक झाल्या आहेत. यासह ३० बस ग्रुप बुकिंगद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. बस स्थानकावरून गणेश भक्तांसाठी २७ ऑगस्टपासून ५० स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या शहरात जाण्यासाठी १५० स्वतंत्र बसची व्यवस्था पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.