विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापासून ते कार्यकारी अभियंता पर्यंतचे अनेक अभियंते आज पदोन्नतीपासून वंचित असून मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आज सर्व प्रवर्गातील सुमारे २५० ते ३५० अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या या पात्र अभियंत्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जात नसल्याने एक प्रकारची नाराजी अभियंत्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. (BMC)
( हेही वाचा: नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प; Amitabh Bachchan यांनी केले आवाहन)
मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी पदांवर कार्यरत असलेले अभियंते हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. आज मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले पात्र कनिष्ठ अभियंता हे दुय्यम अभियंता पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुय्यम अभियंता हे सहायक अभियंता आणि सहायक अभियंता हे कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे उपप्रमुख अभियंता या पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही त्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जात नाही. परिणामी आज अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून त्यामुळे अनेक अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. परिणामी अनेक प्रकल्प कामे तसेच विकासकामे यांना विलंब होत आहे. या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते, परंतु लोकसभा आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागून संपुष्टात आल्यानंतरही पात्र अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. (BMC)
बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे (Brihanmumbai Municipal Engineers Union) कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष (Sainath Rajadhyaksha) यांनी याबाबत बोलातांना, महापालिकेतील कार्यरत अभियंत्यांच्या पदोन्नतीची माहिती संबंधित नगर अभियंता विभागाला असते. जेव्हा ही नियुक्ती होते तेव्हाच ही यादी ठरली जाते, असे स्पष्ट केले. त्यामुळे नियुक्तीनुसार जर पदोन्नती दिल्यास कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. परंतु नगर अभियंता विभाग हे १०० ते २०० पदे रिक्त झाल्यानंतर पदोन्नतीसाठी प्रयत्न करतात आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण होते. नगर अभियंता विभागाच्या आस्थापनावर कोणाचाही अंकुश नसल्याने असे प्रकार होत असून सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता या पदावरील पदोन्नतीचा वाद असून प्रशासन स्तरावर हा तिढा सोडवणे आवश्यक आहे, पण प्रशासन त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही असे सांगितले. (BMC)
कनिष्ठ अभियंत्यांची १०० टक्के पदे बाहेरुन भरली जात असून या भरतीची जाहिरात दिली आहे, तसेच सहायक अभियंता पदावरील ५० टक्के पदे ही अंतर्गत अभियंत्यांच्या पदोन्नतीतून आणि उर्वरीत ५० टक्के बाहेरुन जाहिरात देवून भरली जातात. त्यामुळे या पदोन्नती आणि रिक्तपदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याचे नगर अभियंता महेंद्र उबाळे (Mahendra Ubale) यांनी स्पष्ट केले. (BMC)
अशा प्रकारे आहेत अभियंत्यांची पदे रिक्त
- कनिष्ठ अभियंता ते दुय्यम अभियंता सिविल २०० पदे
- कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत १०० पदे रिक्त
- सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता यांची ७५ पदे रिक्त
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community