Uday Samant : “वसई-विरार पालिकेतील (Vasai-Virar Municipality) नालासोपारा पूर्व भागातील मौजे आचोळे येथे मलजल प्रक्रिया केंद्र आणि डम्पिंग ग्राऊंडकरिता (Dumping ground) आरक्षित जागा होती. या जागेवरील ४१ इमारतींवर न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे २ हजार ५०० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या इमारतींमधील कुटुंबाच्या पुनर्वसनाची शक्यता पडताळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. त्यानुसार पुनर्वसनाबाबत धोरण ठरविण्यात येईल,” अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी विधानसभेत दिली. (Uday Samant)
(हेही वाचा – Bareilly मध्ये भट्टीतून विटा काढताना भिंत कोसळली, ४ कामगारांना वाचवण्यात यश, उर्वरितांचा शोध सुरू )
वसई-विरार शहरातील या निष्कासित इमारतींच्या पुनर्वसनाबाबत सदस्य राजन नाईक (Rajan Naik) यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य पराग अळवणी यांनीही सहभाग घेतला. सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, “इमारतींच्या पुनर्वसनाबाबत भूखंड भूसंपादन आणि पुढील कार्यवाहीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी ‘म्हाडा’, ‘सिडको’ आणि ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’ या यंत्रणांना सोबत घेण्यात येईल. धोरण’ ठरविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्याबरोबरही बैठक घेण्यात येईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community