महापालिकेच्या सॅप प्रणालीच्या वार्षिक देखभालीवर २६ कोटींचा खर्च

178

मुंबई महापालिकेच्यावतीने एसएपी (सॅप)प्रणालीच्या परवान्यांची देखभालीसाठी वार्षिक २५ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी या सॅप प्रणालीच्या देखभालीसाठी एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

( हेही वाचा : मालकी हक्काच्या घरांसाठी सफाई कामगार धडकणार आमदारांच्या घरी)

मुंबई महापालिकेत एप्रिल २००७ पासून सॅप प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीकरता सुरुवातीला २००७मध्ये १ हजार परवान्यांची खरेदी करण्यात आली होती. परंतु या प्रणालीचा वापर व्यापक प्रमाणात झाल्याने आयटी सल्लागार असलेल्या टीसीएसने महापालिकेला २५८० परवान्यांची आवश्यकता असल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार सन २००८ मध्ये अतिरिक्त १५८० परवान्यांची खरेदी करण्यात आली. या प्रत्येक परवान्यासाठी प्रत्येकी ९० हजार रुपये मोजण्यात आले आहे.

त्यामुळे यापूर्वी खरेदी केलेल्या २५८० परवान्यांची वार्षिक देखभाल खर्च खरेदीवर १७ ते २२ टक्के क्रमाक्रमाने वाढत्या दराने प्रत्येक वर्षी अग्रीम अधिदानाने अदा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्याने सन २०११ पासून वार्षिक देखभालीसाठी एसएपी यांच्या शिफारशीनुसार ऑगस्ट २०१६पर्यंत सॅप प्रणालीच्या परवान्यांच्या देखभालीचा वार्षिक खर्च एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड यांना अदा करण्यात आला. परंतु त्यानंतर सॅपच्या परवान्याच्या दरांचा वैधता कालावधी डिसेंबर २०१६ संपुष्टात आल्याने, तसेच जोपर्यंत महापालिका सॅप प्रणाली तसेच परवान्यांचा वापर करत आहे, तोपर्यंत याचा देखभाल खर्च बंधनकारक आहे. त्यामुळे जानेवारी २०१७पासून याच्या वार्षिक देखभालीची जबाबदारी एसएपी इंडिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याच्या परवान्यांची वार्षिक देखभाल खर्च एसएपी इंडिया अदा करण्यात आली. दरम्यान महापालिकेत वापरली जाणारी सॅप प्रणाली अद्ययावत करण्यासाठी मार्च २०१८ एसएपी परवान्याची खरेदी आणि त्यांचा डिसेंबर २०२० पर्यंतचा वार्षिक देखभाल खर्च मंजूर करण्यात आला आणि या सॅप प्रणालीच्या वार्षिक देखभालीची जबाबदारी एसएपी प्रणालीवर सोपवण्यात आली. त्यानुसार याच्या वार्षिक देखभालीचा खर्च एसएपी कंपनीला अदा केला जात असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.