‘विशेष मिशन इंद्रधनुष्‍य -५.०’ : २६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे होणार लसीकरण

केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला दुरीकरण करण्‍याचे ध्‍येय निश्चित केले आहे

215
'विशेष मिशन इंद्रधनुष्‍य -५.०' : २६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे होणार लसीकरण
'विशेष मिशन इंद्रधनुष्‍य -५.०' : २६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे होणार लसीकरण

केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला दुरीकरण करण्‍याचे ध्‍येय निश्चित केले आहे. त्यानुसार मुंबईत ऑगस्‍ट २०२३ पासून तीन फे-यांमध्‍ये विशेष इंद्रधनुष-५.० मोहिम यु-वीन प्रणालीद्वारे राबविण्‍याचे महापालिकेने निश्चित केले आहे. येत्या ७ ते १२ ऑगस्ट २०२३, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर २०२३, तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ राबविण्‍यात येणार आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्‍य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्‍यात आले. या सर्वेक्षणानूसार ० ते ५ वर्षवयोगटातील २६३८ बालकांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण ०७ ऑगस्‍ट ते १२ ऑगस्‍ट २०२३ च्‍या दरम्‍यान करण्‍यात येणार असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगीतले.

‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शहर कृतीदलाची बैठक नुकतीच आयोजित करण्‍यात आली होती. बैठकीत राष्‍ट्रीय एकात्मिक बाल विकास प्रकल्‍प, शिक्षण विभाग, बालरोग तज्ञाची इंडियन असोसिएशन ऑफ पिडीअॅट्रीशन (IAP), जागतिक आरोग्य संस्थेचे प्रतिनिधी, UNICEF, UNDP चे प्रतिनिधी उपस्थित होते.

लसीकरण मोहीमेसाठी समाजाचाही सहभाग

नुकत्याच झालेल्या बैठकीत लसीकरणास विरोध असलेल्‍या ठिकाणी समाजातील महत्वाच्या व्‍यक्‍ती, प्रभावशाली व्‍यक्‍ती यांची मदत घ्या, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी संपूर्ण यंत्रणेला केली. तसेच लसीकरणाविषयी माहिती देऊन पालकांमध्‍ये लसीकरणाविषयी सकारात्‍मकता निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच बालकाच्‍या लसीकरणास प्रवृत्‍त करून ही मोहिम यशस्‍वी करण्‍यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

विशेष मोहीमेसाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

‘विशेष इंद्रधनुष ५-० मोहिम’ यशस्‍वीपणे राबविण्‍याकरीता मुख्‍यालय, विभाग, आरोग्‍य केंद्र स्‍तरावर असे एकूण २६५ प्रशिक्षण सत्रामध्‍ये सर्व आरोग्‍य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. मिशन इंद्रधनुष-५.० मोहिमेअंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्‍या व अर्धवट लसीकरण झालेल्‍या ० ते ५ वर्षवयोगटातील बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण करण्‍यात येणार आहे. सन २०२२ च्या गोवर आजार उद्रेकानुसार ७ जोखीमग्रस्त विभागात सूक्ष्म कृती आराखडा करण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग असणार आहे. जागतिक आरोग्य संघटने मार्फत या मोहिमेत पर्यवेक्षण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – India’s Tour of West Indies : एकदिवसीय मालिका जिंकली. पण, भारतीय संघातील हे कच्चे दुवे उघड)

लसीकरणासाठी होणार जनजागृती

‘विशेष मिशन इंद्रधनुष ५-०’ या मोहिममध्‍ये कोविड लसीकरणाप्रमाणेच लाभार्थ्‍यांचे नोंदणी यु-वीन प्रणालीवर करून त्‍यांना डिजीटल लसीकरण प्रमाणपत्र प्राप्‍त होणार आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष ५-० मोहिम बृहन्‍मुंबई महानगरपालिका यशस्‍वी राबवून डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराच्‍या दुरीकरणाचे ध्‍येय साध्‍य करण्‍याकरीता आरोग्‍य विभाग तयारी करत आहे, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगीतले. गोवर आजार उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण या विशेष मोहिमेत करून घेण्याचे आवाहन देखील डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.