-
प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कालावधीत आणखी ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी दिली.
नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय का घेतला?
शेतकऱ्यांसाठी हमीभावाने तूर खरेदीसाठी २४ जानेवारी २०२५ पासून ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी नोंदणीसाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Workers : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ)
आतापर्यंत झालेली नोंदणी आणि खरेदी
राज्यात २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २९,२५४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी १६१ शेतकऱ्यांकडून १,८१३.८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी
या मुदतवाढीमुळे अजून नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्री करण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणनमंत्री रावल (Jayakumar Rawal) यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्रीची संधी मिळणार आहे, तसेच त्यांना योग्य दर मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community