राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केले. माणगाव येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
(हेही वाचा – Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम ; शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश)
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता ७ ते १२ मार्च दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Aditi Tatkare)
(हेही वाचा – Prayagraj Kumbh mela 2025 : महाकुंभादरम्यान गंगेचे पाणी स्नानास योग्यच होते; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल)
यावेळी बोलताना तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या, “तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. टप्पा दोन अंतर्गतही नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येतील. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ माणगाव तालुक्यावर येऊ नये यासाठी आवश्यक निधी मंजूर करून विकासकामे वेळेत पूर्ण केली जातील. तसेच, लोणशी ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यात आली असून उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community