राज्याच्या सागरी किनारा सुरक्षेसाठी (Coastal Security) राज्य सरकारच्या (State Government) वतीने २८ नवीन बोटी तीन टप्प्यात खरेदी केल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १० नवीन बोटी खरेदी केल्या जातील, अशी माहिती गृह विभागाने (Home Department) शनिवारी (२५ नोव्हेंबर) दिली. याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी पाच इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य सरकारने (State Government) ५१ कोटी मंजूर केल्याची माहितीही विभागाने दिली आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला रविवारी १५ वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा बोटी नाहीत. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने ही माहिती दिली. (Coastal Security)
राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात ३० पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि त्या राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत. याशिवाय राज्याने २५ ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारी भागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात, असे गृह विभागाने म्हटले आहे. (Coastal Security)
सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील (Mumbai Police Force) एक बोट-मुंबई २ चे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच सदर नौकेच्या चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे. सर्व नौकांच्या गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी, राज्याने सर्व सात किनारी घटकांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी ५३ लाख रुपये मंजूर केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे नियंत्रण कक्ष समुद्रात गस्त घालणाऱ्या पोलीस नौकांवर लक्ष ठेवणार असून, त्यांना मार्गदर्शन देखील करु शकणार आहेत.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : कमळा सोबत वाघ ;’त्या’ फोटोवर काय म्हणाले फडणवीस)
पुढील पाच वर्षांसाठी पाच इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स (Intermediate Support Vessels) भाडेतत्तवावर घेण्यात येणार असून या मोठ्या बोटींची समुद्रात खोलवर जाण्याची क्षमता आहे. तसेच त्या प्रतिकूल हवामानाचा सामना देखील करू शकतात. तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) अलीकडेच ८१ मास्टर्स आणि इंजिन चालक आणि १५८ खलाशांच्या कायमस्वरूपी भरतीला मंजुरी दिली आहे. अलीकडेच १६ आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व सागरी सुरक्षेशी निगडीत आस्थापनांच्या सतर्कतेचे मूल्यांकन करण्यासाठी तटरक्षक दलाने ‘ऑपरेशन सागर कवच’ (Operation Sagar Kavach) आयोजित केले होते. या ऑपरेशनमध्ये सर्व ४४ किनारी पोलीस ठाण्यांनी भाग घेतला होता, अशी माहिती गृह विभागाने दिली आहे. (Coastal Security)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community