मुंबईत ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयांतील 29 विद्यार्थ्यांना कोरोना… ‘हे’ आहे कारण

विद्यार्थ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ताप उतरत असताना आता मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी घटना घडली आहे. मुंबीतील केईएम आणि शेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील 29 विद्द्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला असल्याने त्यांना लागण झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना कॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांचे वसतीगृह सील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

29 विद्यार्थ्यांना लागण

केईएम आणि शेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस शाखेतील 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच हे विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता कॉरंटाईन करण्यात आले आहे, तसेच ज्यांच्यामध्ये तीव्र लक्षणं आढळत आहेत, त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

महापौरांनी केले आवाहन

याबाबात मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. त्यात हे विद्यार्थी सहभागी झाले होते. लसींचे दोन्ही डोस घेतले असले तरी कायम मास्कचा वापर करा असे आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे करत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांकडून अनावधानाने निष्काळजीपणा झाला असू शकतो त्यामुळे त्यांना लागण झाल्याची शक्यता महापौरांनी वर्तवली आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतले असले तरी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं आवाहनही महापौरांनी यावेळी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here