महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली तब्बल २९ पदे गायब झाली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. (PWD)
सार्वजनिक बांधकाम विभागात गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात एकूण मंजूर पदे १४ हजार १८१ आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १ हजार ६० पदे राखीव आहेत. अनुसूचित जमातींची भरलेली पदे ८५८ आहेत. २०२ पदांचा पूर्वीचा अनुशेष शिल्लक आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ७४८ आहे. ११० जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १०९ आहे. (PWD)
(हेही वाचा – Air Pollution रोखण्यासाठी डिझेल वाहने, लाकूड/कोळशाच्या भट्ट्या टप्प्याटप्प्याने बंद करा; मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्ताव)
असा आहे रिक्त पदांचा समावेश
यात आस्थापना ३, सेवा १, सेवा २, सेवा ३. प्रशासन ४, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुख्य अभियंता (विद्युत) मुंबई, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) मुंबई, मुख्य वास्तुशास्त्र, संचालक उपवने व उद्याने या १५ विभागातील पदांचा समावेश आहे. (PWD)
अनुसूचित जमाती पदभरती तपशील
संवर्ग | एकूण मंजूर पदे | राखीव पदे | भरलेली पदे | अधिसंख्य पदे
|
गट-अ | ८९० | १०७ | ८२ | १ |
गट-ब | ३०९३ | २२२ | १९६ | १९ |
गट-क | ७१८२ | ५१३ | ३८२ | ५७ |
गट-ड | ३०१६ | २१८ | १९८ | ३२ |
१४१८१ | १०६० | ८५८ | १०९ |
हेही पहा –
Join Our WhatsApp Community