राज्य पोलीस दलात 29 हजार पदे रिक्त; 9 नोव्हेंबरपर्यंत पदे भरण्याच्या सूचना

95

महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिका-यांचीही वानवा आहे. आज घडीला अधिकारी, कर्मचा-यांची मिळून तब्बल 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी 5 जुलै 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव उघड झाले आहे.

पोलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने कोपरगाव, अहमदनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कोरोना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दोन वर्षे लांबली. आता 25 जुलै 2022 रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णीक यांनी त्यावर सुनावणी करताना, पोलीस दलातील रिक्त जागांबाबत 9 नोव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे. वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. कोरोनापूर्वी पोलीस दलात पाच टक्के पदे रिक्त होती. कोरोनानंतर ही टक्केवारी 13 वर पोहोचली आहे.

( हेही वाचा: नारळीपौर्णिमेनिमित्त ठाण्यात वाहतूक मार्गांत बदल; ‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद )

असे आहेत याचिकेतील मुद्दे

पोलिसांची संख्या वाढवा, आठ तास ड्यूटी, रिक्त पदे भरा, वाहने अद्ययावत द्या, यंत्रणा सक्षम करा, तपासासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात करावी, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे, शस्त्रे अद्ययावत असावीत, पोलिसांकडे इलेक्ट्रिक गन असावी, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना असाव्यात, आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.