नवी मुंबईतील 59 वर्षीय वृद्धाने मरणोत्तर अवयवदान करून मुंबई महानगर परिसरातील 29 वे अवयवदान केले. या अवयवदानात रुग्णाच्या कुटुंबीयांनी यकृत, त्वचा, डोळ्यांसह हाडेही दान केली. अवयवदानात सहसा हाडेदान केली जात नाहीत. या रुग्णाच्या नातेवाईकांनी हाडेही दान केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून या कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. 18 ऑगस्ट रोजी हे अवयवदान झाले.
59 वर्षीय रुग्णाला अत्यावस्थ अवस्थेत नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतरही रुग्णाच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. वैद्यकीय तपासाअंती डॉक्टरांनी रुग्णाला मेंदू मृत जाहीर केले. या अवस्थेत रुग्णाच्या शरीरातून अवयवदान करता येतात. डॉक्टरांनी आणि अवयवदान समन्वयकांनी याबाबतची माहिती रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार देताच डोळे, यकृत, त्वचा आणि हाडे दान केली.
(हेही वाचा – Chhagan Bhujbal’s Controversial Statement : शाळांतील प्रतिमांविषयी छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !)
अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय ?
मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्रक्रियेद्वार विलग करून गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचारपद्धत आहे.
कोणत्या अवयवांचे दान करता येते ?
- मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल, तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरलेले असतात.
- उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा मेंदू मृत अवस्थेत जातो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते; परंतु हृदयप्रक्रिया सुरु असते. मेंदू मृत रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते. मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते.
अवयवदान कायदेशीर प्रक्रिया
- देशात मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार मेंदू मृत डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यानंतर घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
- मेंदू मृत मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
- माननी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
- दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया
- जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल, तर रुग्णाने कुटुंबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.
- अवयवादासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये, तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community