2A आणि 7 मुंबई मेट्रो सेवेत; जाणून घ्या तिकिटांचे दर, ‘ही’ आहेत स्थानके

145

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2A आणि 7 या मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई मेट्रोची लाईन 2A दहिसरला अंधेरी पश्चिम डीएन नगरला जोडते आणि तर लाईन 7  दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वला जोडते.

2A मुंबई मेट्रो लाईन 18 किमी पेक्षा जास्त लांब आहे आणि त्यात 17 स्थानके आहेत. अंधेरी, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड(पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कांदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर ( पूर्व), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव ( पश्चिम), वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली ( पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम) या स्थानकांचा समावेश आहे.

( हेही वाचा: श्रमजीवी वर्गाला मान, मोफत मेट्रो; जाणून घ्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्ये )

दहिसर हे दोन्ही मार्गांसाठी सामायिक स्थानके असतील. त्यामुळे ज्यांना डीएन नगर आणि अंधेरी पूर्वेला जायचे आहे. त्यांना इथेच मेट्रो बदलावी लागेल. न्यू लिंक रोड आणि दहिसर पूर्व डीएन नगर दरम्यान रहदारी कमी करणे हे या मार्गांचे मुख्य उद्धिष्ट आहे.

मुंबई मेट्रो लाईन 7 ही 16.5 किमी लांबीची असून त्यात 13 स्थानके आहेत. गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागा ठाणे, देवापाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवरीपाडा या स्थानकांचा यात समावेश आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (Mumbai Metro Rail Corporation) दोन मुंबई मेट्रो मार्गांसाठी तिकीट दर जाहीर केले आहेत. तिकिटांच्या किमती 10 आणि 50 रुपयांच्या दरम्यान असतील. किंमती पूर्णपणे प्रवास अंतरावर आधारित आहेत.

  • 0-3 किमी अंतरासाठी 10 रुपये
  • 3-12 किमीसाठी 20 रुपये
  • 12-18 किमीसाठी 30 रुपये
  • 18-24 किमीसाठी 40 रुपये
  • 24-30 किमीसाठी 50 रुपये

या मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार 600 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.