हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यात बुधवारी (९ ऑगस्ट) रात्री ११:२० वाजता (Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ३.४ एवढी होती. ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. दरम्यान या भूकंपात कुठल्याही प्रकारे जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.
हिमाचल प्रदेश भूकंप (Earthquake) संवेदनशील क्षेत्रांतर्गत येतो. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे डोंगराळ राज्य भूकंपाच्या झोन ४ आणि ५ मध्ये येते. कांगडा, चंबा, लाहौल, कुल्लू आणि मंडी हे भूकंपाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील क्षेत्र आहेत. ४ एप्रिल १९०५ रोजी पहाटे ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने (Earthquake) कांगडामध्ये मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या आपत्तीत १ लाखाहून अधिक घरे आणि वस्त्या उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि २० हजारांहून अधिक मानवी जीव गमवावा लागला, तर ५३ हजारांहून अधिक जनावरे देखील त्यावेळी भूकंपात ठार झाली होती.
(हेही वाचा – No-Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार)
भूकंप (Earthquake) होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर. अशा ७ प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत राहतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, तिथे फॉल्ट लाइन तयार होते आणि त्यांच्या पृष्ठभागाचे कोपरे वाकलेले असतात. त्यामुळे दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्याने निर्माण होणारी ऊर्जा पृथ्वीच्या आतून बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे भूकंप होतात. रिश्टर स्केलवर २.० पेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म श्रेणीमध्ये ठेवले जातात आणि ते शारीरिकदृष्ट्या जाणवत नाहीत. ते फक्त रिश्टर स्केलवर मोजले जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, जगभरात दररोज ८ हजार सूक्ष्म-श्रेणीतील भूकंपांची नोंद केली जाते.
त्याचप्रमाणे २.० ते २.९ तीव्रतेचे भूकंप (Earthquake) किरकोळ श्रेणीत ठेवले जातात. जगाच्या विविध भागांमध्ये दररोज असे एक हजार भूकंप होतात. हे भूकंप जाणवतही नाहीत. रिश्टर स्केलवर ३.० ते ३.९ तीव्रतेचे भूकंप अतिशय हलक्या श्रेणीमध्ये ठेवले जातात, जे एका वर्षात ४९ हजार वेळा नोंदवले जातात. ते जाणवले आहेत, परंतु त्यांची तीव्रता इतकी नाही की जीवित आणि मालमत्तेची हानी होईल. हलक्या श्रेणीतील भूकंप ४.० ते ४.९ तीव्रतेचे असतात, ज्यांची रिश्टर स्केलवर संपूर्ण जगभरात एका वर्षात सुमारे ६,२०० वेळा नोंद होते. या भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवतात आणि त्यांच्यामुळे घरातील वस्तू हलताना दिसतात. तथापि, हे देखील फारसे नुकसान करत नाहीत. रिश्टर स्केलवर ६ च्या वरचे सर्व भूकंप (Earthquake) विनाशकारी असू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community