चार दिवसांत ‘लव्ह जिहाद’ची ३ प्रकरणे उघडकीस! दोघींची आत्महत्या! 

पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात 'लव्ह जिहाद'ची तीन प्रकरणे उघडकीस आली. त्यातील दोन तरुणींनी कंटाळून आत्महत्या केली.

देशात आता दिवसागणिक ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. म्हणून उत्तर प्रदेश, गुजरात सारख्या राज्यांनी यावर आळा घालण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा केला आहे. मागील चार दिवसांत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात ‘लव्ह जिहाद’ची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे त्यातील पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या दोन तरुणींनी कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील कराटे पटूची सन्नी खानला कंटाळून आत्महत्या! 

पश्चिम बंगाल येथे जन्माला आलेली एक हिंदू तरुणी राष्ट्रीय स्तरावरील कराटे पटू होती. तिला सोशल मीडियात स्वतःचे व्हिडीओ बनवण्याचा छंद होता. हाच छंद तिच्या जीवाचा खेळ बनला. ४ जुलै रोजी रात्री त्या तरुणीचा मृतदेह तिच्याच घराच्या छतावर लटकवलेल्या स्थितीत सापडला तेव्हा एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिच्या मृत्यूमागील गूढ उकळले. दोन वर्षांपूर्वी या तरुणीची सोशल मीडियातून सन्नी खान नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. त्याने त्या तरुणीला मॉडलींगमध्ये करियर करून देतो, असे खोटे आश्वासन दिले. तसेच तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर तो त्या तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. याला कांटाळून शेवटी त्या तरुणीने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि घराच्या छतावर गळफास लावून आत्महत्या केली.

(हेही वाचा : नांदेडमध्ये लव्ह जिहाद! घरातील ७२ लाखांचे दागिने चोरून मुलीने मुसलमानाबरोबर केला पोबारा!)

मध्य प्रदेशातील तरुणीची वासिमच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या!

मध्य प्रदेशातील आर्थिक संपन्न जैन परिवारातील एक तरुणी शाळेत असताना वासिम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. ही तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर ती तरुणी वासिमसोबत पळून गेली. कालांतराने तिने घरी संपर्क करून मी स्वच्छेने धर्म बदलला आहे आणि मी वासिमसोबत निकाह केला आहे. तो माझा चांगला सांभाळ करत आहे, असे सांगितले. त्यानंतर काही वर्षांनी तरुणीच्या भावाने तरुणीशी संपर्क केला तेव्हा वासिमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी त्या तरुणीला बाळंतपणासाठी २ लाख रुपये पाठवले. पुढे लॉकडाऊनमुळे पुन्हा त्या तरुणीशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना मिळाली. त्या तरुणीने वासिमच्या अत्याचाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार केले. त्यावर वासिमच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला, मात्र पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही.

(हेही वाचा : शिखांमध्ये पसरतोय’ लव्ह जिहाद’! खलिस्तानींच्या आडून भारतीय शीख लक्ष्य!)

गुजरातमधील तरुणीची महंमदकडून फसवणूक! 

गुजरात येथील राजकोट येथे राहणारी तरुण मागील दीड वर्षांपासून महंमद गनी सामी याच्या प्रेमात होती. त्या दरम्यान महंमद हा त्या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत होता. काही दिवसाने महंमद त्या तरुणीला निकाह (विवाह) करण्यासाठी मुसलमान धर्मात धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकू लागला. मात्र तरुणीने त्याला विरोध केला. त्यानंतर जेव्हा त्या तरुणीला महमंदचा आधीच विवाह झाला असून त्याला तीन मुले आहेत, अशी माहिती मिळताच तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी महंमदवर धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुजरातमधील या कायद्याअंतर्गत हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here