अबब… ३० लाख मृत्यू! कोरोना नव्हे जागतिक महायुद्धच!

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 2020 पर्यंत जगभरात ८ कोटी २० लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे.

एखाद्या जागतिक महायुद्धात जेवढी मनुष्य हानी होते, तेवढी मनुष्यहानी कोरोनामुळे वर्षभराच्या काळात झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये डिसेंबर २०२० पर्यंत जगभरात ३० लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक आकडेवारी दिली आहे. असे असले तरी जगाला देशधडीला लावणारा चीन मात्र या काळात निवांत आहे तिथे फक्त ३,५०० मृत्यू झाले आहे. त्यामुळे चीनवर काय कारवाई होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

१५० देशांमध्ये केला सर्वे! 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 2020 पर्यंत जगभरात ८ कोटी २० लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. तर यापैकी कोरोनाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ३० लाख जणांचा मृत्यू झाला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील १५० देशांमध्ये मार्च ३१ मध्ये सर्वे केला तेव्हा मागील कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९० टक्के देशांमध्ये आरोग्य व्यवस्था डबघाईला आली होती, असे दिसून आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! रोहयो मंत्र्याच्या गावातच रोजगार हमीचे बोगस कामगार!)

बऱ्याच मृत्यूची नोंदच नाही!

संकट काळात आरोग्य डेटा अचूकपणे एकत्रित करणे आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी सर्व देशांकडे आवश्यक क्षमता व संसाधने असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मेळ साधत उत्कृष्ट आरोग्य सुविधा उभारण्याचे महत्त्व सर्वच देशांना समजले आहे, सर्व देशांनी आरोग्य माहिती प्रणाली उभारणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्यविषयक अचूक अहवाल तसेच माहिती प्राप्त करणे अधिक सुलभ होते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेबेरियसस म्हणाले. देशानेही सांगितले.  काही देशांमध्ये फक्त रुग्णालयात झालेले मृत्यू किंवा बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. याव्यतिरिक्त, अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मृत्यूचे कारण समोर येत नसल्याचा उल्लेख त्या अहवालात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here