पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील ३ साधुंना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (१२ जानेवारी) घडली. स्थानिकांनी अपहरणकर्ते समजून या साधुंवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संतप्त जमाव साधुंच्या वाहनाची तोडफोड करताना दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ३ साधू, एक व्यक्ती आणि २ मुले मकरसंक्रांतीनिमित्त स्नान करण्यासाठी गंगासागरला जात होते. त्यावेळी ते वाट चुकले. त्यामुळे त्यांनी रस्त्यातील तीन तरुणांना रस्ता विचारला. त्यावेळी साधुंकडे बघून रस्त्यातील ३ तरुणी किंचाळल्या आणि तिथून पळून गेल्या. त्यामुळे स्थानिकांना साधुंविषयी शंका आली.त्यानंतर स्थानिकांनी साधूंना पकडून बेदम मारहाण सुरू केली.
या घटनेची माहिती काशीपूर पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी जमावापासून साधुंची सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. त्यामुळे साधुंचा जीव वाचला. त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
१२ जणांना अटक
साधुंना मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, या प्रकरणाचा शोध सुरू आहे. साधुंना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. अटकेत असलेल्या सर्व आरोपींना पुरुलियातील रघुनाथपूरमधील न्यायायलयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अभिजीत बॅनर्जी यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community