अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटींची मदत

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.या बाधित शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले गणरायाचे दर्शन)

आपदग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

रक्कम ऑनलाइन जमा होणार

शेतकऱ्यांसाठी मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त,जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here