अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

जून, जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने ३ हजार ५०१ कोटींचा निधी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.
पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. शिवाय राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही मदतीसंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्यक्ष मदत सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
  • राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून ३ हजार ५०१ कोटींचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून, मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.
  • वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात  येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here