BMC : शीव ते लालबाग पर्यंतच्या भुयारी नाल्यांच्या सफाईसाठी ३० कोटींचा खर्च

मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे.

196
BMC : शीव ते लालबाग पर्यंतच्या भुयारी नाल्यांच्या सफाईसाठी ३० कोटींचा खर्च
BMC : शीव ते लालबाग पर्यंतच्या भुयारी नाल्यांच्या सफाईसाठी ३० कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेच्या शीव ते लालबाग पर्यंतच्या ब्रिटीशकालिन जुन्या भूमीगत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये गाळ जमा झाल्याने अनेकदा पावसाचे पाणी वाहून नेण्यात अडचणी येत आहे. भूमीगत पावसाळी वाहिन्यांची साफसफाई मनुष्यप्रवेश असणाऱ्या मॅनहोल्सपुरतीच केली जात असल्याने दोन मॅनहोल्समधील अंतरामधील सफाई होत नाही. परिणामी पावसाचे पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता या भूमीगत पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई करून दोन मॅनहोल्समध्ये साचलेला गाळ मशिन्सद्वारे साफ करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – G20 Summit : भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा; काय म्हणाले पंतप्रधान)

“मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. मुंबई शहरात भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची मोठ्या प्रमाणात जाळे पसरलेले असून या पर्जन्य जल वाहिन्यांचे बॉक्स व आर्च वाहिन्यांची योग्यप्रकारे देखभाल मनुष्य बळ व मशिनरीच्या सहाय्याने केला जातो. परंतु दोन मनुष्य प्रवेशिकांमध्ये अर्थात मॅनहोल्समधील सर्वसाधारण पणे अंतर हे ३० मीटर एवढे असल्याने ते साफ करण्याकरिता सुयोग्य अशी मशिनरीज तसेच कुशल मनुष्यबळ या खात्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांमधील असलेल्या अंधारामुळे व विषारी वायूमुळे आणि हवा खेळती नसल्यामुळे हे काम खात्यांतर्गत मनुष्यबळाने करून घेणे शक्य नसल्याने या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून पुढील चार वर्षांसाठी अर्थात पावसाळा वगळून ३१ महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल ३० कोटी ९४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.