मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभाग अंतर्गत कार्यरत, चिंचपोकळी येथील रुग्णवाहिनी यानगृह (ऍम्ब्युलन्स गॅरेज) येथे शनिवारी ६ जानेवारी २०२४ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ३० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. (BMC)
रुग्णवाहिनी यानगृह कामगार समितीच्या वतीने, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय महानगरपालिका रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक समयपाल भरत पाताडे, वाहनचालक हिरासिंग राठोड, प्रकाश जेधे, एकनाथ शिर्के, गोविंद राणे, धनंजय सोरटे, तुकाराम वळुंज, नितीन यादव, दीपेश झोरे, मधुकर कांबळे, शीलकुमार कांबळे यांच्यासह यानगृहातील कामगार याप्रसंगी उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – Meenatai Thackeray Market : दादरच्या मिनाताई ठाकरे फुल मार्केटचा होणार पुनर्विकास)
मुंबई महानगरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असावा, त्यासाठी रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या यानगृहातील कामगार-कर्मचाऱ्यांनी हे शिबिर आयोजित केले होते. दरवर्षी नियमितपणे अशा प्रकारचे शिबिर यानगृहात आयोजित केले जाते. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community