Shevgaon Voilence: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत दोन गटात हाणामारी; ३० ते ३५ जण ताब्यात

267
Shevgaon Voilence: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत दोन गटात हाणामारी; ३० ते ३५ जण ताब्यात
Shevgaon Voilence: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत दोन गटात हाणामारी; ३० ते ३५ जण ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर दोन गट एकमेकांना भिडले. काही वेळातच दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी ३० ते ३५ जणांचा ताब्यात घेतले आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील सोमवारी दुपारी शेवगावच्या घटनास्थळी भेट देणार आहेत, याबाबतची माहिती अहमदनगरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.

माहितीनुसार, शेवगावमधील महात्मा सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौकापासून बाजारपेठेत दोन गटांकडून दगडांचा मारा करण्यात आला. यात कित्येक वाहनांचे नुकसान झाले. दुकानांच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या. चार चाकी वाहनांची ही तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत प्रचंड दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर रस्त्यावर दगड, चपला आणि फोडलेल्या गाड्यांच्या काचांचा खच पडला होता.

(हेही वाचा – अकोला दंगलीत एकाचा मृत्यू, १० जण जखमी; सध्यस्थिती काय?)

ही सर्व दंगल सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे करण्यात आले.

दगडफेक आणि मारहाणीत जखमी झालेल्या अनेकांना विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा अतिरिक्त फौजफाटा शहरात मागविण्यात आला होता. पोलिसांची वेगवेगळी पथके करून आरोपींची धरपकड सुरू केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.