छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त

144
छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त
छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त

धुळे-सोलापूर रस्त्यावरील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील जांभाळा गावात एका आस्थापनाच्या शेडमध्ये गुन्हे शाखेने धाड घातली. तेथे आणि जवळच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ९ गाड्यांमध्ये असे एकूण ३० टन गोमांस हस्तगत केले आहे. सकाळी ११ पासून चालू झालेली ही कारवाई रात्री ११ वाजेपर्यंत चालू होती. येथील एका हॉटेलसमोर गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त करण्यात आली असून ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम आणि त्यांच्या पथकाने पुरवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही धाड टाकली. या आस्थापनात अवैधरित्या कत्तल करून गोमांस पॅकिंग करून धुळे-सोलापूर रस्त्यावरील या मोक्याच्या जागेवरून देशभर ते विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय आहे.

(हेही वाचा – “२०१४ नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली त्यामुळे…”, Devendra Fadnavis भाषणात नेमकं काय म्हणाले?)

काही दिवसांपूर्वीच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील माळीवाडा परिसरात ८०० किलो गोमांस घेऊन जाणारे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तिसर्‍याच दिवशी ही कारवाई करण्यात आली.

पुण्याहून आले पथक !

मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम, प्रकाश खोले आणि अथर्व सारडा या पुण्याहून आलेल्या पथकाने ही गुप्त माहिती पुरवली होती. छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या वतीने संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोचून ही कारवाई केली. एका मोठ्या शेडमधे मोठ्या प्रमाणात गोमांसाची साठवणूक केल्याचे आणि त्याची ‘पॅकिंग’ केली जात असल्याचे तेथे आढळून आले. ही कारवाई मिलिंद एकबोटे, आशीष जाधव, मनीष वर्मा आणि नवनाथ पाटवकर आदींच्या सहकार्याने पार पडली. (Sambhajinagar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.