‘पीएमपी’ स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. शिवाय ३०० नवीन बस भाडेतत्त्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० ‘सीएनजी’ (CNG Bus) व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. ‘सीएनजी’ बस दाखल होण्यास किमान ३ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बसला मात्र उशीर लागणार आहे. या १२ मीटर लांबीच्या बस असतील.
‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० ‘सीएनजी’ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर २०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर व १०० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय झाला. ‘पीएमपी’त एकूण ४०० नव्या बस दाखल होणार आहेत. यामुळे ‘पीएमपी’ची सेवा सुधारण्यास मदत होणार आहे. सध्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य झाले आहे.
(हेही वाचा – Sheetal Devi : भारताची पॅरा – तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर )
खर्च इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी
‘पीएमपी’ प्रशासनाने ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१ बस आहेत, तर ७ ठेकेदारांच्या मिळून १०९८ बस आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या एकूण ४०० बस पैकी ३०० बस ‘सीएनजी’ आहेत, तर १०० इलेक्ट्रिक आहेत. ‘सीएनजी’वर होणारा खर्च हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी आहे.
नव्या बसमुळे प्रवाशांची सोय
‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ३०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान दोन लाख १९ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल. शिवाय विविध मार्गावरच्या बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. नव्या बसमुळे प्रवाशांची सोय होईल. पीएमपी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. तर ३०० बस ठेकेदारांच्या असणार आहेत. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. तीन महिन्यांत ‘सीएनजी’ बस प्रवासी सेवेत दाखल होतील, अशी माहिती पुणे येथील पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.
हेही पहा –