मुंबईत सध्या सुमारे ३,५०० लोकल (Local) रेल्वे सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० नवीन लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७,१०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणाली राबविण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींचे स्वप्न: सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्म
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे स्वप्न आहे. या दिशेने मुंबईत पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रवाशांसाठी जलद आणि सुलभ वाहतूक सेवा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबईसाठी लोकल (Local) रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद आणि सुलभ होण्यासाठी एकत्रिक सेवा प्रणाली प्रभावी ठरेल. यामुळे महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल.”
याशिवाय, तंत्रज्ञानाच्या मदतीने टॅक्सी आणि इतर सेवांचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधा एका प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध होणार आहेत. यामुळे वेळेची बचत होईल आणि वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Hawkers : फेरीवाल्यांसाठी काय पण! महापालिकेचे अधिकार आता न्यायालयालाही जुमानेनात)
एकात्मिक तिकीट प्रणालीची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र सरकारने शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
- मित्र संस्थेच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल
- यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल
- विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध आणि सुलभ करण्याचे याचे उद्दिष्ट आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू
या बैठकीत मुंबईतील नव्या रेल्वे प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईकरांना ३०० ते ५०० मीटर चालून कोणत्याही सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल, अशा पद्धतीने सेवा सुविधा रचना केली जात आहे. वाहतुकीचे सुलभीकरण आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे.
नवीन रेल्वे सेवा: मुंबईच्या विकासाची दिशा
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, मुंबईत ३०० नवीन लोकल सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांसाठी सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढेल आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होईल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पांमागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील नव्या रेल्वे सेवा आणि एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांना जलद, सुलभ आणि कार्यक्षम वाहतुकीचा लाभ होणार आहे.
(हेही वाचा – Kolkata Doctor Murder Case: कोलकात्याच्या महिला डॉक्टरला अखेर न्याय मिळाला; आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community