बेस्ट – लोकलवर झळकणार भारत- इस्त्राईलची मैत्री

भारत- -इस्त्राईल राजनैतिक संबंधाची 30 वर्षे साजरी करण्यासाठी मुंबईतील इस्त्राईलच्या वाणिज्य दूतावासाने एक विशेष  जनसंपर्क मोहिम हाती घेतली आहे. त्या निमित्ताने बेस्टच्या ताफ्यातील 10 बसवर भारत आणि इस्त्राईल यांच्यातील कृषी आणि जलव्यवसथापन क्षेत्रातील सहकार्यावर भाष्य करण्यात आले. लवकरच मध्य रेल्वेच्या एका लोकलचाही त्यात समावेश होणार आहे.

भारत- इस्त्राईल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची माहिती

5 मे रोजी इस्त्राईलच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण झाली. त्या मोहिमेचा भाग म्हणूनच पुढील महिनाभरासाठी बेस्टच्या  विशेष बस मुंबईत रस्त्यांवर धावतील आणि भारत- इस्त्राईल संबंधांना उजाळा देतील. या दिवसाचे औचित्य साधून इस्त्राईलचे मध्य पश्चिम भारतातील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी आपल्या सहका-यांसह महाराणा प्रताप चौक आणि माझगाव ते मुंबई सेंट्रल आगार असा प्रवास विशेष बसने करुन प्रवाशांना आणि बेस्टच्या कर्मचा-यांना भेटवस्तूंचे वाटप केले. त्यांना भारत- इस्त्राईल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल माहिती दिली.

( हेही वाचा: ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे साकारतेय देशातील सर्वात मोठे मियावाकी स्वरुपाचे शहरी जंगल )

विशेष मोहिम हाती घेतली जाणार

समाजमाध्यमांमध्ये भारत- इस्त्राईल संबंधीची माहिती देणा-या बस आणि लोकलशी संबंधित एक विशेष मोहिम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत. बस आणि लोकल गाडीवर ‘प्राचीन सभ्यता… आधुनिक राष्ट्र आणि भारत- इस्त्राईल दोस्ती के तीस साल बेमिसाल” अशा घोषणाही लिहिल्या आहेत, असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here