Coimbatore मध्ये एटीएसच्या छापेमारीत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक

48
Coimbatore मध्ये एटीएसच्या छापेमारीत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक
Coimbatore मध्ये एटीएसच्या छापेमारीत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक

कोइंबतूरच्या (Coimbatore) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध (Bangladeshi infiltrators) केलेल्या छापेमारीत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने त्यांना तिरुप्पूर आणि कोइंबतूर जिल्ह्यातून अटक केली आहे. याशिवाय, त्रिपुरामध्ये बांगलादेशी घुसखोरांकडून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करीही उघडकीस आली आहे. तसेच तीन बांगलादेशींना घुसखोरी करताना अटक करण्यात आली.

( हेही वाचा : जम्मू-काश्मिर, चीन बॅार्डर आणि मणिपूर हिंसाचारावर लष्करप्रमुख Upendra Dwivedi काय म्हणाले ?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कोइंबतूरमध्ये दहशतवादविरोधी पथकाच्या पाच पथकांनी केलेल्या कारवाईत या बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. हे लोक बऱ्याच काळापासून तिरुप्पुर शहरात आणि तिथल्या ग्रामीण भागात राहत होते आणि येथे काम करत होते. चौकशीदरम्यान, हे लोक बंगालमार्गे देशात घुसल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी इथे बनावट कागदपत्रे बनवल्याचे उघड झाले. या पाच एटीएस पथकात प्रत्येकी ४ पोलिस होते. त्यांनी रात्रीच्या वेळीही कारवाई करत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. अटकेनंतर घुसखोरांना पल्लादम आणि तिरुप्पूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.