आता व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी ३२ लोकांना करता येणार ग्रुप कॉल

111

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज व्यतिरिक्त आता पेमेंट सुद्धा करता येते. याआधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंग करताना अनेक मर्यादा येत होत्या परंतु आता ग्रुप कॉलिंग करताना एकाचवेळी ३२ लोक जॉईन होऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपचे हा सर्वात मोठा अपडेट असून याचा युजर्सला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

( हेही वाचा : आता सव्वा तासात औरंगाबादहून गाठा पुणे, असा असणार नवा मार्ग! )

एकाचवेळी ३२ लोक जॉईन होऊ शकतात

माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या 22.8.80 या व्हर्जनमध्ये युजर्स एकाचवेळी 32 लोकांना ग्रुप कॉलिंगमध्ये जॉईन करून घेऊ शकता. सध्या हे नवीन अपडेट फक्त iOS साठी आणले गेले आहे. आजवर केवळ 8 लोक ग्रुप कॉलमध्ये सामील होऊ शकत होते. मात्र आता ही संख्या 32 झाली आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आपला डिस्प्ले इंटरफेस बदलणार आहे.

नवे फिचर्स

यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर इतरही अनेक नवनवीन फीचर्स येत्या काही दिवसात लॉंच होणार आहेत. यामध्ये पोल या फीचरचा सुद्धा समावेश आहे. पोल हे फीचर सुरू केल्यानंतर युजर्स इन्स्टाग्राम आणि ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपवर आपले मत नोंदवू शकतील. ड्रॉईंग टूल, डाऊनलोड टायमर, २५ जीबीपेक्षा मोठ्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा, प्रोफाईल फोटोसह कव्हर फोटो या फिचर्सचा यामध्ये समावेश असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.