चाकरमान्यांसाठी अतिरिक्त ३२ गणपती उत्सव विशेष गाड्या

116

येत्या गणेशोत्सवाकरता गावी जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी ७४ विशेष गाड्या सोडण्याचे घोषित केल्यांनतर या गाड्या हाऊसफुल्ल होत असल्याने आता मध्य रेल्वेने आणखी ३२ गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त ३२ गणपती विशेष ट्रेन्सच्या वेळा, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आला.

( हेही वाचा : श्रीगणेशोत्सवाकरीता कोकणात जाण्यासाठी ७४ विशेष ट्रेन्स)

मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (१६ सेवा)

01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १३ ऑगस्ट २०२२ ते २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01138 विशेष सावंतवाडी रोड येथून १३ ऑगस्ट २०२२ ते २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)

01139 विशेष नागपूर येथून १३ ऑगस्ट २०२२, १७ ऑगस्ट २०२२ आणि २० ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.

01140 विशेष मडगाव येथून १४ ऑगस्ट २०२२, १८ ऑगस्ट २०२२ आणि २१ ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी रोजी १९.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

पुणे – कुडाळ विशेष (2 सेवा)

01141 विशेष गाडी १६ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथून ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

01142 विशेष १६.८.२०२२ रोजी कुडाळ येथून १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.

पुणे-थिविम/कुडाळ-पुणे विशेष (४ सेवा)

01145 विशेष पुणे येथून १२ ऑगस्ट २०२२ आणि १९ ऑगस्ट २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.

01146 विशेष कुडाळ येथून १४ ऑगस्ट २०२२ आणि २१ऑगस्ट२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

पनवेल – कुडाळ/थिवि – पनवेल विशेष (४ सेवा)

01143 विशेष पनवेल येथून १४ ऑगस्ट २०२२ आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

01144 विशेष थिवि येथून १३ ऑगस्ट २०२२ आणि २० ऑगस्ट२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.

कधीपासून होणार आरक्षण

सर्व गणपती विशेषचे विशेष शुल्कासह बुकिंग ८ जुलै२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.