इस्रायली हल्ल्यात ३३ ठार, १९५ जखमी; Lebanon मधून लाखोंचे स्थलांतर

50
इस्रायली हल्ल्यात ३३ ठार, १९५ जखमी; Lebanon मधून लाखोंचे स्थलांतर
इस्रायली हल्ल्यात ३३ ठार, १९५ जखमी; Lebanon मधून लाखोंचे स्थलांतर

इस्रायल आणि लेबनान यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर इस्रायलने दक्षिण बेरूतसह लेबनानमध्ये हवाई हल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ३३ जण ठार, तर १९५ जखमी झाले आहेत. सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे लेबनानमधील (Lebanon) नागरीक भयभीत झाले असून लाखोंनी सुरक्षित ठिकाणांसाठी स्थलांतर केले आहे.

(हेही वाचा – Bareilly (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची भिंत हिंदूंनी पाडली; पोलिसांनी पुन्हा बांधली)

हिजबुल्लाहवरील हल्ल्यामुळे लेबनानचे कंबरडे मोडले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांनी नसराल्लाहच्या मृत्यूबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे, मात्र बदला घेणार नसल्याचे सांगितले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नसराल्लाहच्या हत्येला ‘ऐतिहासिक वळण’ म्हणत, या घटनेमुळे मध्यपूर्वेतील शक्ती संतुलन बदलण्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी हा हल्ला दहशतवादाच्या बळींच्या न्यायासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यांचा बदला घेत लेबनानने वेस्ट बँकवर हल्ले सुरू केले आहेत. या संपूर्ण संघर्षात आतापर्यंत ७०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, सुमारे १,१८००० लोक विस्थापित झाले आहेत. (Lebanon)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.