Respiratory Disorders : २०१९ ते २०२२ मध्ये श्‍वसनविकारांमुळे मुंबईत ३३,७११ जणांचा मृत्यू

79

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वर्ष २०१९ ते २०२२ या ४ वर्षांच्या कालावधीत श्‍वसनाच्या गंभीर आजारांमुळे (Respiratory Disorders) तब्बल ३३,७११ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत क्षयरोगामुळे १६,३४५ जणांचा मृत्यूमुखी पडले. आधी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ५१-१०० मध्ये म्हणजे ‘समाधानकारक’ होता. वरील कालावधीत तो १०१-२०० मध्ये म्हणजे ‘मध्यम’पर्यंत खालावला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ०-५० असल्यास तो चांगला समजला जातो; मात्र वर्ष २०२३ पर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’ झालेली नाही, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनच्या वतीने ‘मुंबईतील आरोग्य समस्यांची स्थिती २०२४’ नावाचा हा अहवाल ७ नोव्हेंबर या दिवशी प्रकाशित करण्यात आला.

(हेही वाचा Muslim : मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी निकाह न लावण्याचा काझीचा निर्णय)

मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्‍वसनाचे आजार आणि उपलब्ध आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या यांची स्थिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये मुंबईत मधुमेह झालेल्या नागरिकांची संख्या २,४२८ होती; मात्र २०२२ मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती १४,२०७ पर्यंत पोचली. वर्ष २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०७ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक’ चालू केली. त्यामधील ९७ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक’ आधीपासून उभ्या असलेल्या दवाखान्यात चालू करण्यात आली आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालामध्ये ‘आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यासाठी हे दवाखाने १४ तास चालू ठेवायला हवेत, असे नमूद केले आहे. (Respiratory Disorders)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.