आयसीआयसीआय बँकेच्या ‘कॅश स्टोरेज’मधून ३४ कोटी लंपास, तिघांना अटक

प्रातिनिधीक छायाचित्र

आयसीआयसीआय बँकेच्या ९७ शाखांना अर्थ पुरवठा करणाऱ्या आणि शाखांमध्ये जमा होणारी दररोजची रोकड सुरक्षित ठेवण्यात येणाऱ्या बँकेच्या कॅश स्टोरेजमधील रोकडवर कर्मचाऱ्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने डल्ला मारल्याची घटना डोंबिवली पूर्वेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विभागाने तिघांना अटक केली आहे, या तिघांजवळून पोलिसांनी ५ कोटी ८० लाखाची रोकड जप्त करण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

कॅश स्टोरेजची क्षमता १६०० कोटींची होती

अटक करण्यात आलेले तिघे जण या कर्मचाऱ्यांचे साथीदार असून या कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चक्क ३४ कोटी २० लाख रुपयांची रोकड कॅश स्टोरेजमधून काढली, मात्र एवढी मोठी रक्कम घेऊन जाता आली नसल्यामुळे त्यातील १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड घेऊन उर्वरित रक्कम बँकेच्या इमारतीच्या जिन्याजवळ लपवून ठेवले होती व दुसऱ्या खेपेत उर्वरीत रोकड घेऊन जाण्याचा त्यांची योजना होती. इसरार अबरार हुसेन कुरेशी (३३), शमशाद अहमद रियाज अहमद खान (३३), अनुज गिरी (३०) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मुख्य आरोपी असणारा बँकेचा कर्मचारी अल्ताफ शेख हा फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व एमआयडीसी येथे आयसीआयसीआय बँक असून या बँकेच्या आत कॅश स्टोरेज असून या कॅश स्टोरेजची क्षमता १६०० कोटींची आहे. या ठिकाणाहून बँकेच्या ९७ शाखांना रोकड पुरवली जाते, बँकेच्या एटीएममध्ये रोकड जमा करणे तसेच बँकेच्या ९७ शाखेत दररोज जमा होणारी रोकड देखील या येथील स्टोरेजमध्ये ठेवली जाते, या कॅश स्टोरेजमधून कर्मचारी अल्ताफ शेख याने अटक आरोपीच्या मदतीने ही रोकड चोरली होती, ही रोकड बाहेर कशी काढली याबाबत अल्ताफला अटक केल्यानंतर माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

(हेही वाचा दिल्लीत शिवसेनेची पळापळ, लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here