मुंबईतील कोविडबाबत लागू करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर सर्व जनजीवन सुरळीत झाल्यानंतरही ज्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जात होती, ती लाट तुर्तास तरी कुठेही दृष्टीक्षेपात दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून चारशे आणि पाचशेच्या आत समितीत असलेला रुग्णांचा आकडा चारशेच्या खाली उतरला आहे. दिवसभरात केवळ ३४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२० रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के
मुंबईत सोमवारी दिवसभरात ३४१ नवीन रुग्ण आढळून आले. दिवसभरात २८ हजार २२३ रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात ५७० नवीन रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी ४१ हजार ०४४ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोविड रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. तर रविवारी जिथे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे सोमवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून ६० वर्षांवरील होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ११५४ दिवस एवढा आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईमध्ये साडेचार हजार एवढी आहे.
(हेही वाचा : गोंधळानंतर अखेर एमपीएसीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा!)
Join Our WhatsApp Community