मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द! कारण जाणून घ्या…

95

मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या अर्थाला मेल/एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७, ८, ९ आणि १० जानेवारी या चार दिवसांत या गाड्या रद्द करण्यात येणार आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

ठाणे-दिवा येथील ५व्या आणि ६व्या मार्गिकांची सुविधा, नवीन रुळांचे कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा ‘जम्बो मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे. शनिवार, ८ जानेवारी रोजी दुपारी २ ते सोमवार, १० जानेवारी रोजी मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे.

(हेही वाचा मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर थांबणार नाही लोकल! कारण…)

या मेल/एक्स्प्रेस रद्द

७ जानेवारी आणि ८ जानेवारीला या एक्सप्रेस गाड्या रद्द

  • 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
  • 12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

८ जानेवारी आणि ९ जानेवारीला (शनिवार आणि रविवार) या एक्सप्रेस गाड्या रद्द

  • 11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12109 /12110 मुंबई – मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 11401 मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
  • 12123 /12124 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
  • 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
  • 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • 11139 मुंबई – गदग एक्सप्रेस
  • 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

९ जानेवारी आणि १० जानेवारीला (रविवार आणि सोमवार) खालील एक्सप्रेस गाड्या रद्द

  • 11402 आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
  • 11140 गदग – मुंबई एक्सप्रेस
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.