ठाणे-दिवा येथील ५व्या आणि ६व्या मार्गिकांची सुविधा, नवीन रुळांचे कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा ‘जम्बो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. शनिवार, ८ जानेवारी रोजी दुपारी २ ते सोमवार, १० जानेवारी रोजी मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे.
८ जानेवारीला मध्य रेल्वे खालीलप्रमाणे चालविण्यात येणार
- दुपारी १ ते २ दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद (Slow/SemiFast) सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
- दुपारी २.०० नंतर अप-डाउन दोन्ही मार्गावरील धीमी/अर्धजलद लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
- दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.
बसेस चालवण्याची व्यवस्था
ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून ट्रेन सुटणार नाहीत. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील. सोमवारपासून सेवा वेळापत्रकानुसार पूर्ववत होतील.
( हेही वाचा : प्लास्टिक बाटल्या द्या! मोफत चहा आणि वडापाव मिळवा, वाचा…
मेल/एक्स्प्रेस सेवा:
७ जानेवारी आणि ८ जानेवारीला या एक्सप्रेस गाड्या रद्द
- 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
- 12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
- 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
८ जानेवारी आणि ९ जानेवारीला (शनिवार आणि रविवार) या एक्सप्रेस गाड्या रद्द
- 11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
- 12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
- 12109 /12110 मुंबई – मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
- 11401 मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
- 12123 /12124 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
- 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
- 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
- 11139 मुंबई – गदग एक्सप्रेस
- 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
९ जानेवारी आणि १० जानेवारीला (रविवार आणि सोमवार) खालील एक्सप्रेस गाड्या रद्द
- 11402 आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
- 11140 गदग – मुंबई एक्सप्रेस
पुणे येथे एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
- 17317 हुबळ्ळी – दादर एक्सप्रेस ( ७ आणि ८ जानेवारी)
- 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस दि. (८ आणि ९ जानेवारी)
पुण्याहून एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन
- 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (९ आणि १० जानेवारी)
- 17318 दादर- हुबळ्ळी एक्सप्रेस ( ८ आणि ९ जानेवारी)