केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर केला. अर्थसंकल्पात, सीतारमण यांनी घोषणा केली आहे की, ३६ जीवरक्षक औषधांवरील सीमाशुल्क (Custom Duty) काढून टाकले जाईल. ज्यामुळे या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात. ही औषधे कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. सरकारच्या या निर्णयामुळे कर्करोग (Cancer) आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना महागड्या औषधांपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, सरकारने ५ टक्के सीमाशुल्क यादीत इतर ६ जीवरक्षक औषधांचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे या औषधांच्या किमतीही कमी होऊ शकतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, कर्करोग, दुर्मिळ आजार (Rare diseases) आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी सरकारने ३६ जीवरक्षक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सहा जीवरक्षक औषधांचा समावेश अशा औषधांच्या यादीत करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यावर ५ टक्के सवलतीच्या दराने सीमाशुल्क आकारले जाईल. तसेच, या औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मोठ्या प्रमाणात औषधांवर पूर्ण सूट आणि सवलतीचे शुल्क लागू असेल. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवरील आर्थिक भार कमी होईल.
३६ जीवनरक्षक औषधे कोणती?