राज्यातील वीज वितरण कंपनी महावितरणला होत असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने मोठी वीर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामूळे प्रस्तावावर लवकर निर्णय घेतला आहे. ही दरवाढ थोडी थोडकी नसून तब्बल ३३७ कोटी आहे. त्यामुळे कंपनीने याचा भार तेथे नागरिकांना जबरदस्त फटका बसणार आहे.
पाच वर्षांनंतर होते दरवाढ
महावितरणला सध्या सुमारे १५०० कोटी रुपयांचा तोट सहन करावा लागला आहे. यानुसार आगामी वीजदर आढाव्यात तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. तर, वर्ष २०२४-२५मध्ये आणखी १५ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. या प्रस्तावामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात; त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल २०२०पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात असून, हे दर या वर्षी एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्या अंतर्गत ‘महावितरण’ने भरमसाट दरवाढ प्रस्तावित केली आहे. या नवीन दरांनुसार, घरगुती ग्राहकांचा सध्या असलेला किमान दर ३.३६ रुपये प्रतियुनिटवरून २०२३-२४साठी (एक एप्रिलपासून) ४.५० रुपये प्रतियुनिट होणार आहेत; तर सध्याचा ११.८६ रुपये प्रतियुनिट हा कमाल दर आता १६.६० रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. या दोन्ही श्रेणींमधील सन २०२४-२५ साठीचा वीजदर अनुक्रमे ५.१० रुपये ते १८.७० रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. व्यावसायिक श्रेणीतील ग्राहकांसाठीचा सध्या असलेला किमान ७.०७ रुपये ते ९.६० रुपये प्रतियुनिटचा दर, आता १२.७६ रुपये ते १७.४० रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तवित आहे. त्यापुढील वर्षासाठी हा दर किमान ११ रुपये ते कमाल २० रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तावित आहे. लघु दाब श्रेणीतील शेतकऱ्यांसाठीचे दरदेखील किमान १.९५ रुपये ते कमाल ३.२९ रुपये प्रतियुनिटवरून २.७० रुपये ते ४.५० रुपये प्रतियुनिट करण्याबाबत नमूद आहे.
(हेही वाचा आता डेन्मार्क दर शुक्रवारी जाळणार कुराण)
Join Our WhatsApp Community