-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती ही लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रीक हजेरी (Facial Biometric Attendance Machines) प्रणालीद्वारे नोंदवली जावी. यासाठी एक जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रीक हजेरी प्रणाली बंद करण्यात आली. त्यामुळे सध्या फेशियल बायोमेट्रीक हजेरी प्रणाली बसवली जात असून आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १५०० मशिन्सची खरेदी केल्यानंतर आता अतिरिक्त ३७५ मशिन्सची खरेदी करण्यात येत आहे. (Facial Biometric Attendance Machines)
(हेही वाचा – पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रीक प्रणालीद्वारे (Facial Biometric Attendance Machines) नोंदविणे आणि यासाठी रजा व्यवस्थापन प्रणाली तसेच सध्याच्या हजेरी संगणक प्रणालीत बदल तथा सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हाताच्या बोटांच्या ठशांद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाते. हाताच्या बोटांच्या ठशाद्वारे उपस्थिती नोंदवायची सध्याची बायोमेट्रीक यंत्रणेद्वारे मेणाच्या अंगठ्याचा वापर करून बोगस उपस्थिती नोंदवण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे सध्याची बायोमेट्रीक हजेरी प्रणाली बंद करून त्याऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा आतापर्यंत विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १५०० मशिन्स बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून दिली जात आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरु झाली आहे. (Facial Biometric Attendance Machines)
(हेही वाचा – कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक Qari Shahzad ची गोळ्या झाडून हत्या)
आतापर्यंत खरेदी केलेल्या फेशियल बायोमेट्रीक मशिन्सच्या (Facial Biometric Attendance Machines) तुलनेत शहर भागातील मशिन्सची संख्या कमी असल्याने आता अतिरिक्त ३७५ मशिन्सची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राट कंपनीला विभागून मशिन्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. यानुसार मॉर्डन इंफॉर्ममेटीक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून १७५ मशिन्स आणि आय. डी. टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून २०० मशिन्सची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या आणि येणाऱ्या मशिन्सच्या खरेदीवर तब्बल १३ कोटी ८५ लाखांचा खर्च होत आहे. यामध्ये मॉर्डन इंफॉर्ममेटीक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ७.२४ कोटी रुपये आणि आय. डी. टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ६.६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तर दोन्ही कंपनीला अनुक्रमे ९८ लाख रुपये आणि १ कोटी १२ लाख रुपयांचे वाढीव कंत्राट देण्यात आले आहे. (Facial Biometric Attendance Machines)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community