राज्यात 39 लाख विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि पुस्तके मिळण्यात येणार अडचण? काय आहे कारण

189

सरल प्रणाली अंतर्गत राज्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती भरणे हे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक असल्यामुळे शिक्षकांना नोंदणी करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आपले आधार कार्डच नसून, तब्बल 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी होत नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे.

सरल प्रणालीत नोंदणी करताना अडचणी

विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके आणि गणवेश देण्यासाठी सरल प्रणाली अंतर्गत त्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. राज्यातील शिक्षकांकडून या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकांकडून या नोंदणीचे काम करण्यात येत असून, यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सरल प्रणालीत नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे देखील गरजेचे आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फतवा, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिका-यांना बसणार चाप)

पण साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नसल्यामुळे त्यांची नोंद सरल प्रणालीत करता येणे शक्य नाही. तसेच 39 लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होत नसल्याचे देखील राज्याच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

शिक्षकांची मुदतवाढीची मागणी

आधार कार्ड तयार नसल्यामुळे, शाळांना आधार कार्ड पुरवण्यात न आल्यामुळे तसेच आधार कार्डमधील माहिती जुळत नसल्यामुळे ही नोंदणी होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरल प्रणालीतील नोंदणीसाठी शिक्षकांना 30 नोव्हेंबर पर्यंतची तारीख देण्यात आली असून, यामध्ये मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO: PF कापला जात असेल तर निवृत्तीनंतर किती पैसे मिळणार? बघा संपूर्ण गणित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.