मुंबई-तिरुवनंतपुरम, पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या एसी डब्यांमध्ये कायमस्वरूपी वाढ

173

मध्य रेल्वेने मुंबई-तिरुवनंतपुरम आणि पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेसमध्ये तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी कोचची कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वेने प्रत्येक विरुद्ध नमूद केलेल्या तारखांपासून पुढील गाड्यांना दोन अतिरिक्त तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी कोच जोडले जाणार आहेत.

( हेही वाचा : आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? शेलारांचे उद्धव ठाकरेंना पत्र)

तृतीय एसी इकॉनॉमी कोचमध्ये कायमस्वरूपी वाढ

ट्रेन क्रमांक १६३३१ मुंबई-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस १८ सप्टेंबर २०२२ पासून

ट्रेन क्र. १६३३२ तिरुवनंतपुरम-मुंबई एक्सप्रेस १७ सप्टेंबर २०२२ पासून

ट्रेन क्रमांक १६३८१ पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस २३ सप्टेंबर २०२२ पासून

ट्रेन क्र.१६३८२ कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस २२ सप्टेंबर २०२२ पासून

ट्रेन क्र.१६३३१/१६३३२ ची सुधारित रचना : दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ६ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी यासह एक गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर व्हॅन.

ट्रेन क्र.१६३८१/१६३८२ ची सुधारित रचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ६ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी यासह एक गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर व्हॅन आणि एक पँट्री कार

आरक्षण : ट्रेन क्र.१६३३१ आणि १६३८१ मधील एसी-३ टायर इकॉनॉमी कोचसाठी बुकिंग ४.९.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.