Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दिनांक ३ जुलै २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : पुण्यात ४ जुलैपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा)

मध्य रेल्वे मार्गावार मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल- वाशी अप आणि हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी सेक्शन मध्ये विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here