छत्तीसगडमध्ये ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप!

131

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सूरजपूर जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजता रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू भातगावपासून 11 किमी अंतरावर आहे. छत्तीसगडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. उत्तर छत्तीसगडमध्ये गेल्या 10 महिन्यांतील हा सहावा भूकंप आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान हा देशद्रोहच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले )

यासंदर्भातील माहितीनुसार सुरगुजा विभागात भूकंपाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे तेथील स्थानिक लोकांनी सांगितले. भीतीमुळे लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने अनेकांना त्याची माहिती मिळू शकली नाही.भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, घटना घडल्यानंतर अंबिकापूर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही तात्काळ वर्गाबाहेर सोडण्यात आले.यापूर्वी 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 5.28 वाजता 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू बैकुंठपूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या गेज धरणाजवळ होता. यापूर्वी, 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.57 वाजता 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचा केंद्रबिंदू सूरजपूरपासून 11 किमी अंतरावर आणि पृष्ठभागापासून 10 किमी खाली होता.

तसेच, त्याआधी 29 जुलै 2022 रोजी बैकुंठपूरला लागून असलेल्या सोनहाट भागात 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यादरम्यान चरचा भूमिगत खाणीत झालेल्या स्फोटामुळे डझनभर मजूर जखमी झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू बैकुंठपूरजवळील सोनहट भागात भूपृष्ठापासून 16 किमी खोलीवर होता. बस्तरचे खासदार दीपक बैज यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात लोक 7व्या मजल्यावरून पायऱ्यांवरून खाली पळताना दिसून आले. गेल्या 21 मार्च रोजी रात्री 10.17 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.