Gujarat Earthquake: गुजरातमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

210

गुजरातमध्ये रविवारी, भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.३ मोजण्यात आली आहे. माहितीनुसार, गुजरातमधील राजकोट हे भूकंपाचे केंद्र आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, गुजरातमधील राजकोटपासून २७० किमी उत्तर-वायव्येस दुपारी ०३:२१ वाजता हा भूकंप झाला.

गेल्या बुधवारी, २२ फेब्रुवारीला दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.६ इतकी मोजली गेली. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळ होता. शिवाय नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. येथे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील पिथौरागढपासून १४३ किमी पूर्वेला होता. त्याची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नव्हती.

दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.५१ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली होती.

(हेही वाचा – तुर्कीनंतर आता तजाकिस्तान हादरले! 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप, चीनमध्येही जाणवले धक्के)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.