बांगलादेशात हिंदूंवर (Hindu) होणाऱ्या अत्याचाराविरोधात अखेर बांगलादेशी सरकारला जाग आली आहे. बांगलादेशाच्या (Bangladesh) मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या अंतरिम सरकारने सुनमगंज जिल्ह्यात मंदिर आणि तोडफोडीच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : मुंबईवर कर्नाटकचा हक्क; काँग्रेस आमदार Laxman Savadi यांनी उधळली मुक्ताफळे)
सुमनगंज जिल्ह्यातील दोराबाजार परिसरात मंदिर आणि हिंदू (Hindu) बांधवांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी बांगलादेशच्या (Bangladesh) कायदा अंमलबजावणी विभागाने ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी १२ जणांव्यतिरिक्त पोलिसांनी १५० ते १७० अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अलीम हुसैन (१९), सुलतान अहमद राजू (२०), इम्रान हुसैन (३१) आणि शाहजहान हुसैन (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community