राज्याच्या आरोग्य क्षेत्राला बळ; ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, ४ हजार ३६५ कोटींची तरतूद

282
राज्याच्या आरोग्य क्षेत्राला बळ; ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, ४ हजार ३६५ कोटींची तरतूद
राज्याच्या आरोग्य क्षेत्राला बळ; ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, ४ हजार ३६५ कोटींची तरतूद

राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास बुधवारी (२८ जून) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या आरोग्य क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे.

पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालांतराने निश्चित करण्यात येईल. सध्या २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांच्या प्रवेश क्षमता ३ हजार ७५० विद्यार्थी इतकी आहे. महाराष्ट्रात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७४ इतके डॉक्टरांचे प्रमाण आहे. तर देशपातळीवर हे प्रमाण ०.९० इतके आहे. या नऊ महाविद्यालयांसाठी ४ हजार ३६५ कोटी ७२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Methanol Economy : नीती आयोगाने मिथेनॉल अर्थव्यवस्थेचा बनवला रोडमॅप)

दीनदयाळ अंत्योदय योजनेची व्याप्ती वाढवली

केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान १५३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या २५९ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सामाजिक अभिसरण संस्था विकास, स्वयं रोजगार कार्यक्रम, कौशल्य प्रशिणाद्वारे रोजगार, नागरी पथविक्रेत्यांना सहाय्य, नागरी बेघरांना निवारा ही कामे करण्यात येतील. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदीया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही योजना राबविण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.