साकीनाका येथे राहणा-या चार वर्षांच्या मुलीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा गोवरचा संशयित मृत्यू असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. मुंबईत आतापर्यंत गोवरमुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू गोवरचा संशयित मृत्यू आहे. मृत्यू अहवाल छाननी समितीकडून अंतिम अहवाल मिळाल्यानंतर संशयित गोवर मृत्यूबाबत स्पष्टता येईल, असे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
साकीनाका येथील चार वर्षांच्या मुलीचे मृत्यूप्रकरण
६ डिसेंबरला मुलीला ताप आला. तीन दिवसानंतर तिच्या चेह-यावर आणि अंगावर पूरळ येण्यास सुरुवात झाली. तिच्या पालकांनी ११ डिसेंबरला तिला सरकारी रुग्णालयात हलवले. मुलीची प्रकृती गंभीर होत चालल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. परंतु दुस-या दिवशी तिचा मृत्यू झाला.
( हेही वाचा: नववर्षात रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळणार खास सुविधा! या स्थानकांवर सुरू होणार ‘ममता कक्ष’ )
Join Our WhatsApp Community