सहलीसाठी गेलेली ४० विद्यार्थ्यांची बस उलटली; ४ विद्यार्थी गंभीर, १० जखमी

40 students tour bus break fail 4 students serious and 10 injured
सहलीसाठी गेलेली ४० विद्यार्थ्यांची बस उलटली; ४ विद्यार्थी गंभीर, १० जखमी

राज्यात अपघाताच सत्र सुरुच आहे. समुद्धी महामार्गावरील रविवारी घडलेला भीषण अपघात ताजा असतानाच आता नाशिक आणि अहमदनगरला जोडणारा म्हैसवळण घाटात ४० विद्यार्थ्यांना नेणाऱ्या सहलीच्या बसला अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर परिसरातील नागरिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच जखमी विद्यार्थ्यांना एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

माहितीनुसार, रविवारी सकाळ, दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पूर्वकडील नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा म्हैसवळण घाटात विश्राम गडावरून टाकेद नाशिकच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या MH 15 AK 1632 या बसचा ब्रेक फेल झाला. या बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. बसचा ब्रेक फेल झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला बस घसरवली. यावेळी बस उलटी झाली आणि यामुळे ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर १० जण जखमी झाले.

स्थानिकांच्या मदतीने बसमधील विद्यार्थांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सध्या एस एम बी टी रुग्णालयातील कार्डेक रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या पोलिसांकडूनही पाहणी करण्यात आली असून क्रेनच्या मदतीने अपघाती बस बाजूला सारली आहे. तसेच परिस्थितीही नियंत्रणात आली आहे.

(हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघात सत्र सुरुच; कारच्या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर ३ जण जखमी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here