Agriculture News : फळ पिकांच्या स्वयंचलित ठिबकसाठी ‘इतक्या’ हजाराचे अनुदान; धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

संत्रा फळ पिकाची गळती सुरु झाली असून फळबागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती.

133
एक वर्षात पीएम किसान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ; Dhananjay Munde यांचा दावा

अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले. मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले! धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदनकर्त्या शेतकऱ्यासह असंख्य शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. (Agriculture News)

धनंजय मुंडे हे मागील महिन्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी यावेळी त्यांना निवेदन दिले होते. संत्रा फळ पिकाची गळती सुरु झाली असून फळबागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती. (Agriculture News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा आढावा घेत असताना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ, स्वयंचलित क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Agriculture News)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : परंपरेत अडथळा आणू नका; मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठा समाजाला आवाहन)

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शेतकरी सचिन अग्रवाल यांनी याबाबत एक पत्र लिहून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. याआधीही मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम ७० रुपये प्रमाणे अनुदान तसेच सेंद्रिय आणि रासायनिक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फळ पिकांसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. (Agriculture News)

निवेदनाचे फलित

एका सामान्य शेतकऱ्याच्या निवेदनाची कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने दखल घ्यावी. त्यातून एखादी योजना राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना लागू व्हावी, हे उदाहरण म्हणजे आदर्श ठरावे असेच आहे. (Agriculture News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.